Short News

अहमदाबाद: बिल्डिंग कोसळली; १० जण अडकले

अहमदाबाद: बिल्डिंग कोसळली; १० जण अडकले

अहमदाबादमधील ओढाव येथे रविवारी रात्री उशिरा इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. बचावकार्यात स्थानिकांनीही मदत केली. जखमींना रुग्णालयात पोहोचवले.
जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे

जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे

जळगाव मनपाच्या महापौरपदी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड निश्चित झाली आहे. तर उपमहापौर पदी भाजपचे डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी जयश्री महाजन आणि उपमहापौर पदासाठी प्रशांत नाईक यांचाही अर्ज देण्यात आला आहे. त्यावरही आज औपचारिक घोषणा होणार आहे. महापालिकेची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली होती.
शिखर धवनचे दमदार शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

शिखर धवनचे दमदार शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली. दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. एकेरी धाव काढत त्याने आपले शतक साजरे केले. शिखरचे हे एकदिवसीय सामन्यातील 14 वे शतक आहे. सध्या भारताची धावसंख्या 38 षटकात 2 बाद 215 धावा अशी झाली असून शिखर 113 तर दिनेश कार्तिक 17 धावांवर खेळत आहे.
विजय मल्ल्याच्या व्यंगचित्रावरुन काँग्रेसचा भाजपवर निशाणा

विजय मल्ल्याच्या व्यंगचित्रावरुन काँग्रेसचा भाजपवर निशाणा

9 हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. #जन की बात असा मथळा देत एक व्यंगचित्र काँग्रेसने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली हे मंगळागौरीतला एक पारंपारिक खेळ खेळताना दिसत आहेत. तर विजय माल्ल्या विदेशात पळताना दाखवला आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more