Short News

रेल्वेचे प्रवाशांना भेट; मदुराई ते नेपाळ श्री रामायण एक्स्प्रेसचे आयोजन

रेल्वेचे प्रवाशांना भेट; मदुराई ते नेपाळ श्री रामायण एक्स्प्रेसचे आयोजन

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवी भेट आणली आहे. यंदाच्या वर्षी भारतातील मदुराईपासून नेपाळपर्यंत रामायणाशी संबंधित असलेल्य़ा विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी एका विशेष एक्स्प्रेसचे आयोजन केले आहे. श्री रामायण एक्स्प्रेस असे या रेल्वेगाडीचे नाव आहे. तामिळनाडूतील मदुराई येथून सुरू होणारा हा रेल्वेप्रवास नेपाळमधील जनकपूरपर्यंत असणार आहे.  14 नोव्हेंबर 2018 रोजी ही एक्स्प्रेस मदुराईमधून निघेल. 
राफेल डीलचा करार दोन देशांमध्ये झाला - फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

राफेल डीलचा करार दोन देशांमध्ये झाला - फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राफेल डील प्रकरणाच्या वादावर थेट बोलणे टाळले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, राफेल डीलचा करार दोन देशांमध्ये झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे म्हटले आहे, त्याचाच मी संदर्भ देत आहे. त्यावेळी मी अध्यक्ष नव्हतो.
भर दुपारी घर फोडून चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

भर दुपारी घर फोडून चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

औरंगाबाद रेल्वेस्टेशन बाबा पंपाच्या रोडवरील शिल्पनगरातील सी.ए.चे घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये पळविल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वेदांतनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. महेश अग्रवाल व त्यांची पत्नी हे दोघे कामानिमित्त नेहमीप्रमाणे गेले असता घरी कुणीच नव्हते.
संस्थाचालकानेच केला आश्रम शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार

संस्थाचालकानेच केला आश्रम शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार

सांगली कुरळप येथील आश्रम शाळेतील सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिनाई आश्रम शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. अरविंद पवार असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. पवार याने सहा मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more