Short News

यूएईच्या मदतीवरुन भाजपाचा डाव्या सरकारवर हल्लाबोल

यूएईच्या मदतीवरुन भाजपाचा डाव्या सरकारवर हल्लाबोल

केरळमधील पूरग्रस्तांना संयुक्त अरब अमिराती (युएई)च्या 700 कोटींच्या मदत जाहीर करण्यात आली नसल्याचा खुलासा यूएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी केला. यावरुन भाजपाने केरळमधील डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाला बदनाम करण्यासाठी केरळमधील डाव्या सरकारने यूएईकडून मदत मिळाल्याचे सांगितले, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा वावर; भाविकांना सतर्कतेच्या सूचना

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा वावर; भाविकांना सतर्कतेच्या सूचना

गिरगाव चौपाटी नजीकच्या समुद्रात स्टिंग रे माशांचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अनंत चतुदर्शीच्या दिवशी चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. गेल्यावर्षी विसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या अनेक लोकांना स्टिंग रे माशांनी दंश केला होता. स्टिंग रे माशाच्या दंशांनंतर असह्य वेदना होतात. 
महिला टी-२० : भारतीय महिलांची श्रीलंकेवर ५ गडी राखून मात

महिला टी-२० : भारतीय महिलांची श्रीलंकेवर ५ गडी राखून मात

कोलंबोत खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेवर ५ गडी राखून मात केली. या विजयासह भारतीय महिलांनी ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. मुंबईकर जेमायमा रॉर्ड्रीग्जने सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे.
पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी

पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी

स्वाईन फ्लूने शहरात आणखी १० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. तर सध्या विविध रुग्णालयांमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मागील दोन महिन्यांत शहरात स्वाईन फ्लुने कहर केला आहे. राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more