Short News

वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली

वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटल्याची घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बोटीत खासदार, पोलिसांसह अधिकारी सुद्धा बसले होते. बस्तीमधील कुआोना नदीच्या घाटावर वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी राज्यमंत्री सुरेश पासी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रमापाती राम त्रिपाठी, यांच्यासह 17 लोक बोटीत होते. 
धवन आणि रोहितची शतकीय पारी, भारताचा पाकिस्तानवर 9 विकेटने विजय

धवन आणि रोहितची शतकीय पारी, भारताचा पाकिस्तानवर 9 विकेटने विजय

आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्मा आणि शिखर धवनने शानदा शतक ठोकत पाकिस्तान वर 9 विकेटने विजय प्राप्त केला. पहिली फलंदाजी कराताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 238 धावांचे आव्हान ठेवलेले. याचा पाठलाग करताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक साजरे केले. शिखर धवन 100 चेंडूत 114 धावांकरून बाद झाला. या दोघांनी पहिल्या विकेट 204 धावांची विक्रमी भागेदारी केली. रोहितने 119 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.
लग्नाचे अमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून एका मॉडल आणि अभिनेत्रीवर तिच्या सहकारी अभिनेत्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'या अभिनेत्याने लग्नाचे अमिष दाखवले होते. त्यानंतर तो मला दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घेऊन गेला होता. तिकडून येताना राजस्थानच्या अलवरमधील एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचे पीडिते सांगितले.
शिखर पाठोपाठ रोहितचंही अर्धशतक, भारत विजयाच्या समीप

शिखर पाठोपाठ रोहितचंही अर्धशतक, भारत विजयाच्या समीप

पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 238 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक साजरे केले आहे. रोहित शर्माचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. सध्या भारताची धावसंख्या 25 षटकांत बिनबाद 138 धावा अशी झालेली असून धवन 80 तर रोहित 57 वर खेळत आहे. पाकिस्तानचा एकही गोलंदाज या जोडीसमोर टिकाव धरताना दिसत नाही आहे.ओ
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more