Short News

जगभरात रोज समुद्रात फेकला जातो 9 कोटी 20 लाख किलो कचरा

जगभरात रोज समुद्रात फेकला जातो 9 कोटी 20 लाख किलो कचरा

जगभरात कचऱ्याचा प्रश्न आघाडीवर असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. शहरांच्या विविध भागांत असणाऱ्या कचऱ्याबरोबरच समुद्रात असणाऱ्या कचऱ्याची समस्याही मोठी असल्याचे समोर आले आहे. इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप इनिशिएटीव्ह या संस्थेतर्फे हे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. समुद्रात दररोज किती कचरा फेकला जातो याविषयीचा सर्व्हे केला गेला आहे. दररोज 9 कोटी 20 लाख किलो कचरा फेकला जातो.
गांजा विकणाऱ्या  5 महिला तस्कर  मुंईत अटक

गांजा विकणाऱ्या 5 महिला तस्कर मुंईत अटक

मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने 5 महिला तस्करांना अटक केली आहे. या महिलांकडून 7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. कमली शिंदे, शशिकला शिंदे, पार्वती धनगर, कमला कपूर आणि मेरी अर्जुन अशी अटक करण्यात आलेल्या महिला तस्करांची नावे आहेत. या अटक तस्कर महिला गोरेगाव व कांदिवली परिसरातील महाविद्यालयीन मुलांना गांजा विकत होत्या. यातील दोन महिला तस्करांना या आधीही अटक करण्यात आली होती.
वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार

वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार

नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर माहिती बाहेर येऊ नये म्हणून आरोपींनी पीडित महिलेला दगडाने ठेचून मारहाण केल्याची संतापजनक कृत्यही त्यांनी केले. या घटनेने नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेला नागपूरच्या आरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला 100 कोटी अनुदान

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला 100 कोटी अनुदान

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील आमराई क्लबमधी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more