Short News

तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार?

तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार?

मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारे तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे. हे विधेयक लोकसभेत आधीच पास झाले असून राज्यसभेत आज सादर करण्यापूर्वी या विधेयकात तीन महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधी कायदा करण्याचे निर्देश गेल्या वर्षी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मांडले होते. 
विमानतळावर ३ कोटींची बिस्किटे हस्तगत

विमानतळावर ३ कोटींची बिस्किटे हस्तगत

दुबईहून पुण्यात विमानाने दाखल झालेल्या एका प्रवाशाकडून सोन्याची तब्बल ८६ बिस्किटे हस्तगत करण्यास सीमा शुल्क विभागाला गुरुवारी यश मिळाले. पुणे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. या बिस्किटांची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. दुबईवरून आलेले स्पाइसजेटचे विमान (एसजी-५२०) लोहगाव विमानतळावर उतरले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
अटलजी सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते - उद्धव ठाकरे

अटलजी सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अटलजी तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले असे त्यांनी म्हटले.
दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद

दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. दिल्ली, बिहार, झारखंड आणि पंजाबमध्ये शुक्रवारी सरकारी कार्यालयं आणि स्कूल-कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये आज सरकारी कार्यालयं, स्कूल आणि कॉलेज बंद राहणार आहेत. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more