Short News

पती सोबत रहायचे कि, नाही हे ठरवण्याचा पत्नीला अधिकार – सर्वोच्च न्यायालय

पती सोबत रहायचे कि, नाही हे ठरवण्याचा पत्नीला अधिकार – सर्वोच्च न्यायालय

पत्नीला पती सोबत राहण्याची इच्छा नसेल तर तसा निर्णय घेण्याचा अधिकार तिला स्वत:ला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले आहे. या प्रेम कथेत एका मुस्लिम तरुणाला हिंदू मुलीसोबत लग्न करायचे होते. यासाठी धर्मातंर करुन तो हिंदू बनला व त्या मुलीसोबत लग्न केले. फेब्रुवारी महिन्यात रायपूरमधल्या २३ वर्षीय हिंदू जैन तरुणीसोबत लग्न करण्यासाठी त्याने धर्मांतर केले.
नगरसेविकेच्या पतीचे स्वतःच्याच मुलीसोबत अश्लील चाळे

नगरसेविकेच्या पतीचे स्वतःच्याच मुलीसोबत अश्लील चाळे

इचलकरंजी येथील एका नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा विकृत पिता मागील 3 वर्षापासून स्वतःच्याच 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. या मुलीचे वडील एक मोठे उद्योजक आहेत. सुरुवातीला घरात कोणी नसताना वडील तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार करायचा. तसेच पत्नीच्या समोरही मुलीसोबत अश्लील चाळे करत होता.  
..तर भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियातही नाकामी ठरेल : पाँटिंग

..तर भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियातही नाकामी ठरेल : पाँटिंग

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून दोन महिने लांब असला,तरीही त्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारतीय फलंदाजीला सुचक सल्लासह इशारा दिला आहे. 'भारताची इंग्लंडमधील कामगिरी पाहता, चेंडू स्विंग झाला तर भारताची फलंदाजी सहज कोलमडेल,असे विधान पाँटिंग यांनी केले. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत पराभूत झाला होता.
विदर्भ-मराठवाड्यात दोन दिवस पावसाचा अंदाज

विदर्भ-मराठवाड्यात दोन दिवस पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 21सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात याच्या परिणामी पावसाचे संकेत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात 21आणि 22 सप्टेंबर रोजी पाऊस पडेल,असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ,गोंदिया,भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more