Short News

महिला शंकराचार्य बनू शकत नाही: स्वामी स्वरूपानंद

महिला शंकराचार्य बनू शकत नाही: स्वामी स्वरूपानंद

'महिला राजकारणासह कोणत्याही इतर शेत्रात जाऊ शकतात, मात्र त्या सनातन संस्थेचे प्रतिनिधी असलेले शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे वक्तव्य द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. इतकेच नाही तर, नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ पीठाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अखिल भारतीय विद्वत परिषदेवरही आक्षेप नोंदवले आहेत. 
अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील दोघा जणांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवार मध्यरात्री एक वाजता केली. चेतन विनायक साटेलकर(24), अजय सुर्यकात कवणकर (20) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे अवैध दारूची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 
चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा

मध्यप्रदेशातील सतना येथे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शिक्षकाला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तीन महिन्यांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिनेश कुमार शर्मा यांनी 23 वर्षीय महेंद्र सिंह गोंड याला ही शिक्षा सुनावली आहे. 1जुलै रोजी मुलीवर बलात्कार झाला होता. अद्यापही मुलीची प्रकृती गंभीर  आहे. 
इम्रान खान मिठी मारण्यासाठी पुढे आला तर विराट कोहली पाठ दाखवणार का ?

इम्रान खान मिठी मारण्यासाठी पुढे आला तर विराट कोहली पाठ दाखवणार का ?

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेण्यावरुन भाजपने नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान सिद्धू यांनी आपल्या गळाभेटीचे समर्थन करत माझी गळाभेट म्हणजे राफेल करार नव्हता असा टोला मारला. आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याचे उदाहरण दिले आहे. आपण पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळत आहोत. मग भारतीय खेळाडू पाकिस्तान खेळाडूंकडे पाठ करणार का ? असा सवाल केला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more