World Short News

अमेरिकेत 'शटडाऊन', सरकारी कर्मचारी बिनपगारी सुट्टीवर

अमेरिकेत 'शटडाऊन', सरकारी कर्मचारी बिनपगारी सुट्टीवर

महासत्ता अमेरिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक पेचप्रसंग (शटडाऊन) ओढावले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुट्टीवर जावे लागणार आहे. अमेरिकन सिनेटने ट्रम्प सरकारचा निकडीच्या खर्चाचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर अमेरिकेची वाटचाल शटडाऊनच्या दिशेने सुरू झाली होती. यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला प्रस्तावित फ्लोरिडा दौरा रद्द करावा लागला होता.
पाकिस्तानात भगत सिंग यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

पाकिस्तानात भगत सिंग यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

पाकिस्तानमधील एका संघटनेने शहीद-ए-आजम पुरस्कारप्राप्त शहीद भगत सिंग यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर' देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ८६ वर्षांपूर्वी भगत सिंग यांना लाहौरमधील ज्या शादमान चौकात फाशी देण्यात आली तेथे त्यांचा पुतळा उभारावा अशीही मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्रलढ्यातील क्रांतिकारांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी संबंधित संस्था काम करते. 
हाफिज सईदविरोधात कारवाई करा; अमेरिकेचे पाकिस्तानला खडेबोल

हाफिज सईदविरोधात कारवाई करा; अमेरिकेचे पाकिस्तानला खडेबोल

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत.अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नोएट यांनी पत्रकार परिषदेत हाफिज सईदला दहशतवादी म्हणून संबोधले.सईद हा मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा सुत्रधार असल्याचेही त्या म्हणाल्या.त्याचबरोबर पाकिस्तानने हाफिज सईदला क्लिनचिट दिल्याने अमेरिकेने नाराजी व्यक्त करून सईदविरोधात कारवाई व्हायला हवी असे सांगितले.
या गावात इतकी थंडी की लोकांचे केस आणि पापण्या देखील गोठल्या

या गावात इतकी थंडी की लोकांचे केस आणि पापण्या देखील गोठल्या

तुम्ही-आम्ही कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी या गावात आहे. जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. तब्बल उणे 62 तापमान. या गावात सगळं काही गोठून जातं. जमीन, पाणी, शाई, अन्न इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव.