Short News

अमेरिकेत शिख समुदायाच्या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा हल्ला

अमेरिकेत शिख समुदायाच्या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा हल्ला

शिख समुदायाच्या भारतीय अमेरीकी वृध्द व्यक्तीस अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव साहिबसिंग नाथ असून त्यांचे वय 71 वर्ष आहे. ही घटना 6 ऑगस्टला कॅलिफोर्निया येथे घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. शिख समुदायाच्या व्यक्तींवर एकाच आठवड्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या शिख नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. 
IND vs ENG Test 3rd day : भारताकडे 367 धावांची आघाडी

IND vs ENG Test 3rd day : भारताकडे 367 धावांची आघाडी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने संयमी सुरुवात केली. मैदानावर असलेल्या कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने आपल्या अर्धशतक पूर्ण केले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या धाव संख्येच्या जोरावर भारतीय संघाने भोजन विश्रांतपर्यंत 367 धावांची आघाडी मिळवली आहे. यामुळे या कसोटी सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे. 
अटलजींचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी

अटलजींचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी

जीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावे याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत केले. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. 
Asian Games 2018: कबड्डीमध्ये भारताचा एका गुणाने पराभव

Asian Games 2018: कबड्डीमध्ये भारताचा एका गुणाने पराभव

आशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या थरारक लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी घेतलेली होती. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more