Short News

ब्राझीलच्या चलनाची किंमत घसरल्याने साखरेचे दर गडगडले

ब्राझीलच्या चलनाची किंमत घसरल्याने साखरेचे दर गडगडले

ब्राझीलच्या चलनाची किंमत घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर गडगडले आहेत. परिणामी साखरेच्या दरांनी गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळी गाठली आहे. भारताला याचा मोठा फटका बसणार आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर प्रति टन ६०० डॉलर इतका होता. तो घसरून प्रति टन ३०६ डॉलरवर म्हणजे निम्यावर आला आहे.
प्रियकराच्या मदतीने पत्नीने धावत्या गाडीत केली नवऱ्याची हत्या

प्रियकराच्या मदतीने पत्नीने धावत्या गाडीत केली नवऱ्याची हत्या

 विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली. बंगळुरुत यशवंतपूरमधील बीके नगर येथे ही घटना घडली. ममता असे आरोपी महिलेचे नाव असून ती येलहंका जवळच्या वीरासागरा येथे राहते. दुसऱ्या आरोपीचे नाव अप्पू (24) आहे. ममताने अप्पूच्या मदतीने पती सागाई राजची (30) हत्या केली. ममता आणि अप्पूने सागाई राजला दारु पाजल्यानंतर त्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली.
गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने 202 मंडळांवर गुन्हे दाखल

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने 202 मंडळांवर गुन्हे दाखल

गणेशोत्सव काळात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या मंडळावर कारवाई होणार आहे. मुंबई पोलिसांनी या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. संबंध मुंबईत ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी एकूण 202 गणेशोत्सव मंडळावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. 65 ते 70 डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे.
साताऱ्यात  ढोलच्या तालावर नाचताना दिसले शिवेंद्रसिंहराजे

साताऱ्यात ढोलच्या तालावर नाचताना दिसले शिवेंद्रसिंहराजे

गणेशोत्सव विजर्सन मिरवणुकीत डीजे वाजणारच, मंगळवार तळ्यावरच गणेश विसर्जन होईल, अशी भूमिका साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली होती. प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घेणारे उदयनराजे साधे गणेश विसर्जन मिरवणुकीत दिसलेही नाही. उदयनराजे यांच्या अनुपस्थितीची चर्चा सर्वत्र राहिली. मात्र ढोल ताशांच्या गजरावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठेका धरला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more