Short News

भारत – पाकिस्तान सैन्याचा पहिल्यांदाच संयुक्त सराव

भारत – पाकिस्तान सैन्याचा पहिल्यांदाच संयुक्त सराव

सीमा रेषेवरील तणावपूर्ण वातावरणात एकमेकांसमोर उभे ठाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला. शांघाय सहकार्य संघटनेतील देशांनी शुक्रवारी संयुक्त लष्करी सराव केला असून यात भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. रशियात हा संयुक्त सराव करण्यात आला. शांघाय सहकार्य संघटनेतील चीन, रशिया व अन्य देशांचे सैन्य ‘शांतता मिशन २०१८' अंतर्गत संयुक्त सराव करत आहेत. 
पत्नीने आत्महत्या करताच पतीनेही मारली विहिरीत उडी

पत्नीने आत्महत्या करताच पतीनेही मारली विहिरीत उडी

अमरावती येथे कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे घडली. पत्नीने गळफास घेतल्यानंतर पतीने विहिरीत उडी मारली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्याचा शोध सुरू आहे. निंभोरा बोडखा येथील सुनीता संजय दाभाडे (वय ३५) या महिलेने गावातीलच संजय दाभाडे (वय ४२) याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघेही शेती व मोलमजुरी करत होते.
रोहित शर्माचं अर्धशतक, भारताने ओलांडला 100 धावांचा टप्पा

रोहित शर्माचं अर्धशतक, भारताने ओलांडला 100 धावांचा टप्पा

आशिया चषकातील आजच्या सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर 174 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक साजरे केले आहे. भारताकडून शिखर धवन आणि रोहितने चांगली सुरुवात केली होती. पण धवन 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला अंबाती रायडू देखील 13 धावा करून बाद झाला आहे. रोहित शर्माचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे.
यामुळे नेहा धूपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी!!

यामुळे नेहा धूपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी!!

अंगद बेदी आणि नेहा धूपिया यांच्या अचानक लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नेहा लग्नापूवीर्चं प्रेग्नंट असल्याची. प्रेग्नंसीमुळेच नेहा व अंगदने घाईघाईत लग्न उरकले, असेही मानले गेले. सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. असे नेहाने म्हटले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more