Short News

आमच्याकडे कुलभूषण जाधव यांच्या विरोधात भक्कम पुरावे - पाकिस्तान

आमच्याकडे कुलभूषण जाधव यांच्या विरोधात भक्कम पुरावे - पाकिस्तान

आमच्याकडे कुलभूषण जाधव यांच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आम्ही खटला जिंकू, अशी आशा पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आम्ही आमचा मुद्दा परिणामकारकपणे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी
नापिकीला कंटाळून नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना हदगाव तालुक्यातील निमगाव येथे घडली. या शेतकऱ्याचे नाव संजय राठोड असे आहे. संजय राठोड (39) यांनी यावर्षी शेतात हळद आणि कापसाची लागवड केली होती. पण पावसाने हुलकावणी दिल्याने पीकाचे नुकसान झाले. राठोड यांच्यावर आधीचे कर्ज होते. यावर्षी पीक आले नाही, तर हे कर्ज कसे फेडायचे याची भ्रांत त्यांच्यापुढे होती.  
पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या सामन्यांवर बंदी हवी- गौतम गंभीर

पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या सामन्यांवर बंदी हवी- गौतम गंभीर

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका वर्षानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने आहेत. पण भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा सामना होऊ नये,असे वक्तव्य क्रिकेटपटू गौतम गंभीरने केले. भारत-पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारेच संबंध असता कामा नये. जर भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सीरिज खेळत नसेल तर आशिया कपमध्ये का खेळत आहे,असा सवाल केला . 
अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील दोघा जणांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवार मध्यरात्री एक वाजता केली. चेतन विनायक साटेलकर(24), अजय सुर्यकात कवणकर (20) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे अवैध दारूची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more