Short News

माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल – डोनाल्ड ट्रम्प

माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल – डोनाल्ड ट्रम्प

जर आपल्याविरोधात महाभियोग चालवला तर अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स अॅण्ड फ्रेंड्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘मला तुम्हाला सांगायचं आहे की जर माझ्याविरोधात कधीही महभियोग चालवण्यात आला तर बाजार कोलमडेल. मला वाटतं प्रत्येकजण गरीब होईल'.
भारताचा पाकिस्तान विजय; अमेरिकाही खुष, दिल्या भारताला शुभेच्छा

भारताचा पाकिस्तान विजय; अमेरिकाही खुष, दिल्या भारताला शुभेच्छा

आशिया चषकच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या हाय व्हॉल्टेज सामन्यावर जगभरातील लोकांच्या नजरा होतात. भारताच्या या विजयाचा आनंद अमेरिकेला देखील झाला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी भारताला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भारताला आशिया चषकातील आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार

पालघर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. ही घटना डहाणू येथील आगर या गावात घडली. या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडपाच्या ठेकेदाराचा शोध पोलीस घेत आहेत. मंडपात पुजा करण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीवर एका 24 वर्षीय युवकाने बलात्कार केला. 
राम मंदिर लवकरात लवकर व्हायला हवं: मोहन भागवत

राम मंदिर लवकरात लवकर व्हायला हवं: मोहन भागवत

अयोध्येत राममंदिराची उभारणी लवकरात लवकर व्हावी, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. या प्रश्नावर संवाद व्हावा, मात्र मंदिरासाठी चळवळ उभारणाऱ्या राम मंदिर समितीचा याबाबत अंतिम निर्णय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंदिर उभारणीसाठी वटहुकूम काढणार का, याबाबत आपण काही सांगू शकणार नाही, असे ते म्हणाले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more