Short News

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, ३ ठार, ११ जखमी

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, ३ ठार, ११ जखमी

फ्लोरिडाच्या जॅक्सनविल येथे एका हॉटेलमध्ये काही लोकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाला ठार करण्यात पोलिसांना यश आलं असून या घटनेमुळे जॅक्सनविले परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून हल्लेखोरांचा कसून तपास केला जात आहे.
नेपाळ लवकरच पॉर्न वेबसाईटस करणार बंद

नेपाळ लवकरच पॉर्न वेबसाईटस करणार बंद

देशात बलात्काराच्या घटना वाढत असल्यामुळे नेपाळ सरकारने पॉर्नोग्राफीक कंटेटची निर्मिती करणाऱ्या पॉर्न वेबसाईटस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही बंदी अंमलात येईल असे नेपाळ सरकारने शुक्रवारी सांगितले. पॉर्नोग्राफीक कंटेटमुळे बलात्कार वाढत आहेत असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. काही महिन्यात नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ.
इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा

इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा

भारत विरुद्ध बांगलादेश या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला यश मिळालं. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो म्हणजे रवींद्र जडेजा. विरोधी संघाचे चार गडी बाद करत सामनावीर म्हणूनही त्याला गौरवण्यात आलं. यावेळी जडेडाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. या सामन्यानंतर त्याचं कौतुक झालं खरं आणि खऱ्या अर्थाने इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नसल्याचंच म्हणत त्याने टीकाकारांना उत्तर दिलं.
राफेल प्रकरणावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं : संजय राऊत

राफेल प्रकरणावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं : संजय राऊत

राफेल लढाऊ विमान खरेदी कराराबाबत रिलायन्सचे नाव भारतानेच सुचवल्याचा गौप्यस्फोट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी नुकताच केला आहे. त्यामुळे आता यावर मंत्रिमंडळातील इतर कोणीही नाही तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, फ्रान्स्वा ओलांद हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more