Short News

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक

व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने राष्ट्रपती निकोलस मादुरो यांचा कथित हत्येचा प्रयत्न करणाऱ्या मास्टरमाईंडला शोधून काढले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. चार ऑगस्टला झालेल्या घटनेसंबंधित तपासादरम्यान ड्रोन उडवण्यात येणाऱ्या जागेचा शोध घेण्यात आला. ज्या लोकांनी हत्यार तयार केले, स्फोट घडवला त्यांची ओळख पटली आहे. यासंदर्भात दोन ड्रोन वैमानिकांना अटक करण्यात आली आहे. 
येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल्या अनेक भागात, मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार आहे. केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, तसेच, मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबारच्या विसरवाडीत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा हा अंदाज महत्वाचा मानला जातोय.
भारत-पाक क्रिकेट मालिकेसाठी इम्रान खान उत्सुक

भारत-पाक क्रिकेट मालिकेसाठी इम्रान खान उत्सुक

इम्रान खान यांनी पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, भारत-पाक क्रिकेट मालिका पुन्हा एकदा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी एहसान मणी यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान इम्रान खान दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका पुन्हा सुरु करण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य नवनिर्वाचीत अध्यक्ष मणी यांनी केलं आहे.
‘म्हारी छोरीयां छोरों से कम हैं के’म्हणत आमीरकडून विनेश फोगाटचं अभिनंदन

‘म्हारी छोरीयां छोरों से कम हैं के’म्हणत आमीरकडून विनेश फोगाटचं अभिनंदन

आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दंगल चित्रपटात महावीर फोगाट यांची भूमिका निभावत त्यांचा संघर्ष रुपेरी पदड्यावर आणणाऱ्या आमीर खाननेही विनेशचं अभिनंदन केलं आहे. ‘म्हारी छोरीयां छोरों से कम हैं के', हा दंगलचा डायलॉग म्हणत त्याने विनेशचं कौतूक केलं आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more