Short News

सूर्याच्या दिशेने झेपावले नासाचे  'सोलर प्रोब यान'

सूर्याच्या दिशेने झेपावले नासाचे 'सोलर प्रोब यान'

नासाने ऐतिहासिक झेप घेतली असून सोलर पार्क प्रोब यान आकाशात झेपावले आहे. रविवारी दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले. सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास हे यान करणार आहे. रामायणकाळात मारुतीरायांनी लहान असताना फळासारखे लालबुंद दिसणाऱ्या सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख आहे. हे यान एका कारच्या आकाराएवढे  आहे. 
'उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती'

'उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती'

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे धागेदोरे समोर आले आहेत. मात्र, त्यापूर्वीच दोन तरुणांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत दोन तरुण आपणच उमर खालिदवर हल्ला केल्याचे सांगत आहेत. उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती, असे या तरुणांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री होणे साधी गोष्ट नव्हे- रामदास कदम

मुख्यमंत्री होणे साधी गोष्ट नव्हे- रामदास कदम

शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये विळ्याभोपळ्याचे सख्य असले तरी नांदेड शहरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी एका उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेडचे विद्यमान पालकमंत्री रामदास कदम एकत्र आले होते. यावेळी रामदास कदम यांनी अशोक चव्हाणांचा सत्कार करत त्यांची प्रशंसाही केली. मी चव्हाणांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.
एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा

एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा

एसबीआयने सर्व डेबिट कार्ड धारकांना एटीएम-कम-डेबिट कार्ड बदलण्याची सुचना केली आहे. सर्व ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड बदलवून इलेक्ट्रॉनिक चिप (इव्हीएम)कार्ड घ्यावे असं आवाहन एसबीआयकडून करण्यात आलं आहे. जर कार्ड बदलवलं नाही तर सुरक्षेच्या कारणांमुळे तुमचं कार्ड ब्लॉक केलं जाईल असा इशारा एसबीआयने दिला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more