Short News

नासाचे सूर्याला गवसणी घालण्याचे एेतिहासिक 'उड्डाण' 24 तासांनी लांबले; तांत्रिक बिघाड

नासाचे सूर्याला गवसणी घालण्याचे एेतिहासिक 'उड्डाण' 24 तासांनी लांबले; तांत्रिक बिघाड

नासा ही संस्था आज दुपारी 1 वाजता अतिशय तप्त अशा सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी अंतराळ यान पाठविणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अखेरच्या क्षणाला हा निर्णय बदलण्यात आला. आता हे यान उद्या, रविवारी दुपारी पाठविणार आहे. नासाने 24 तासांनी यानाचे उड्डाण लांबणीवर टाकले. सोलर पार्क प्रोब असे या यानाचे नाव असून ते सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणार आहे.
अटलजींच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

अटलजींच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. त्यांचे पार्थिव सायंकाळी साडेसातच्या  सुमारास त्यांच्या निवासस्थानी आणले जाणार आहे. त्याठिकाणी समर्थकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. उद्या भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मारक स्थळ येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
भारतमातेने आज आपला सुपुत्र गमावला- राहुल गांधी

भारतमातेने आज आपला सुपुत्र गमावला- राहुल गांधी

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. आज भारतमातेने आपला सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर जनतेने अतोनात प्रेम केले. तसेच त्यांचा आदरही राखला, अशा नेत्याचे आपल्यातून जाणे हे निश्चितच क्लेशदायक आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
देशातल्या महान नेत्याचे निधन झाल्याचे अतीव दुःख : राष्ट्रपती

देशातल्या महान नेत्याचे निधन झाल्याचे अतीव दुःख : राष्ट्रपती

भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत देशाने एक महान आणि व्यासंगी नेता गमावला असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी मनला अत्यंत वेदना देणारी आहे. त्यांचे नेतृत्त्व अत्यंत प्रेरणादायी होते, असेही रामनाथ कोविंद यांनी म्हटले. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more