Short News

ऑस्ट्रेलियाच्या पतंप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची नियुक्ती

ऑस्ट्रेलियाच्या पतंप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची नियुक्ती

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची नियुक्ती झाली आहे. माल्कम टर्नबुल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत नेतृत्त्वाच्या चढाओढीच्या बंडानंतर माल्कम टर्नबुल यांनी राजीनामा देत आपली खुर्ची स्कॉट मॉरिसन यांना दिली. शिवाय माल्कम यांच्या मंत्रीमंडळातील ३ महत्त्वाच्या मंत्र्यांनी माल्कम यांचा पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे पंतप्रधान पद जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
तिहेरी तलाकच्या समर्थनार्थ  उच्च न्यायालयात  याचिका

तिहेरी तलाकच्या समर्थनार्थ उच्च न्यायालयात याचिका

तिहेरी तलाक गुन्हा ठरविण्याचा केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा अध्यादेश बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. मुंबईतील नगरसेवक मसूर अन्सारी आणि सामाजिक संस्था रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन यांच्यातर्फे वकील देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिक दाखल केली आहे. 
राफेल : कागदपत्रे जप्त करुन FIR दाखल करा, काँग्रेसची मागणी

राफेल : कागदपत्रे जप्त करुन FIR दाखल करा, काँग्रेसची मागणी

राफेल डील प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी काँग्रेसने मोदी सरकारची तक्रार करण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोगाचा दरवाजा खटखटला आहे. केंद्रीय सतर्कता आयोगाशी चर्चा केल्यानंतर याप्रकरणी एफआयआर दाखल करुन स्वतंत्र्य चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मांनी केली.
गणेश विसर्जनदरम्यान राज्यात एकूण 24 जणांचा बुडून मृत्यू

गणेश विसर्जनदरम्यान राज्यात एकूण 24 जणांचा बुडून मृत्यू

रविवारी राज्यभर गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच राज्याच्या काही भागात झालेल्या दुर्घटनांमुळे भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले. रविवारी गणेश विसर्जनावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांमध्ये 24 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यात जुन्नर आणि जालन्यातील प्रत्येकी तीन तरुणांचा, तर अमरावती, यवतमाळ आणि भंडाऱ्यात प्रत्येकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more