Short News

अमेरिकेत 21 हजार भारतीय अनधिकृत; सुरक्षा विभागाची माहिती

अमेरिकेत 21 हजार भारतीय अनधिकृत; सुरक्षा विभागाची माहिती

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही 21 हजारपेक्षा अधिक भारतीय नागरिक सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने हा अहवाल सादर केला. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या माहितीनुसार इतर देशांच्या तुलनेत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या भारतीयांचे प्रमाण कमी आहे. तरी या प्रकारणांत भारताचा पहिल्या 10 देशांच्या यादीत क्रमांक आहे.
चीनची पुन्हा मुजोरी, लडाखमध्ये घुसखोरी

चीनची पुन्हा मुजोरी, लडाखमध्ये घुसखोरी

डोकलाम वादानंतर चीनने पुन्हा एकदा मुजोरी दाखवत भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केली आहे. लडाखमध्ये डेमचॉक भागात चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारतीय हद्दीत 300 ते 400 मीटर अंतरापर्यंत घुसखोरी केली. यावर कळस म्हणजे चिनी सैन्याने तिथे पाच तंबूही उभारले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैन्याने लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली. भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना विरोधही दर्शवला.
अडचणीच्या वेळी भारतीय रुग्णावर उपचार करण्यास पाकिस्तानचा नकार

अडचणीच्या वेळी भारतीय रुग्णावर उपचार करण्यास पाकिस्तानचा नकार

तुर्कस्तानच्या एका विमानानं प्रवास करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्यानं या फ्लाईटचं लाहोर विमानतळावर एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं होतं. परंतु, पाकिस्तानकडून उपचारास नकार देण्यात आल्यानं या प्रवाशाला तब्बल सात तासांनंतर दिल्ली विमानतळावर उपचार उपलब्ध झाले. या घटनेची तक्रार रुग्णाच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परदेश मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करून केलीय.
रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तारीखदेखील कन्फर्म झाली आहे. 2018च्या सरुवातील दोघांनी साखरपुडा केल्याची माहितीसमोर आली. तेव्हापासून दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रणवीर आणि दीपिकाचा साखरपुडा श्रीलंकेत झाला होता. 20 नोव्हेंबरला दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असल्याचे समजतेय. अभिनेता कबीर बेदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more