Maharashtra Short News

नाभिक समाजावतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध; मोर्चा, दुकाने बंद

नाभिक समाजावतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध; मोर्चा, दुकाने बंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अपमानास्पद भाष्यामुळे नाभिक समाजातर्फे मोर्चा काढून याचा निषेध करण्यात आला. शनिवारी एक दिवस दुकाने बंद ठेवण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री जाहीर माफी मागणार नाही, तोपर्यंत नाभिक समाज निषेध अधिकाधिक तीव्र पद्धतीने करण्याचा इशारा यानिमित्त देण्यात आला.

तळे हिप्‍परगा रोड येथील अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

तळे हिप्‍परगा रोड येथील अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सोलापूरपासून १० कि.मी अंतरावर असलेल्‍या तळे हिप्‍परगा रोड येथे झालेल्‍या अपघातात ३ विद्यार्थ्‍यांचा मृत्‍यू झाला आहे. १ विद्यार्थी गंभीर जखमी असून त्‍याच्‍यावर येथील शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे साडेतीनच्‍या दरम्‍यान पेट्रोलिंग करताना पोलिसांना ही बाब लक्षात आली. संगमेश माळगे,अक्षर असबे,दिपक गुमडेल असे मृत विद्यार्थ्‍यांची नावे आहेत.

आज मुंबईत मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

आज मुंबईत मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईत मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप स्लो मार्गावर तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणे-वाशी/नेरुळ स्थानका दरम्यानही मेगाब्लॉक घेण्यात आहे.

११.२० ते ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.रेल्वे रुळाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असेल.

मुंबईत दोन सोनसाखळी चोरांना अटक

मुंबईत दोन सोनसाखळी चोरांना अटक

दिल्लीहून मुंबई फिरण्यासाठी आलेल्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार दिवसात दोघांनी नऊ सोनसाखळ्या चोरल्या होत्या. आकाश लाल आणि भीकू असे यांचे नाव आहे.

ते आपल्या नातेवाईकांकडे मुंबई फिरण्यासाठी आले होते. मुंबईत राहणाऱ्या आकाश सिंह आणि विमल सिंह यांच्या मदतीने बाईक घेऊन सोनसाखळ्यांची चोरी केली.