Short News

मुंबई: रिक्षा चालकाचे महिलेसमोर हस्तमैथून

मुंबई: रिक्षा चालकाचे महिलेसमोर हस्तमैथून

मुंबईत महिलांना सध्या विकृतांचा सामना करावा लागत आहे. रिक्षातून घरी जाणाऱ्या एका पत्रकार महिलेसमोर चालकाने अश्लील चाळे केले. इतकंच नाही तर त्याने त्यानंतर अर्ध्या रस्त्यात रिक्षा थांबवत या महिलेसमोर आपली पँट काढून हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही धक्कादायक घटना महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केली. रात्रीच्या सुमारास मालाड येथून पीडित महिलेने घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.
वाहतुकीचे नियम मोडल्याचा जाब विचारणे पडले महागात, मारहाणीत तरूणाचा मृत्यू

वाहतुकीचे नियम मोडल्याचा जाब विचारणे पडले महागात, मारहाणीत तरूणाचा मृत्यू

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जाब विचारणे मुंबईच्या एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. संपत सोनावणे असे मृत तरुणाचे नाव असून मुंबईच्या कुर्ला इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. संपत हे ठक्कर बाप्पा कॉलनीतून घरी जात असताना दोन दुचाकीस्वार विरुद्ध दिशेन येत होते. संपत यांनी त्यांना जाब विचारला असता त्या दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत संपत यांच्या डोक्याला दखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. 
अतीतटीच्या सामन्यात भारताचा हाँगकाँगवर 26 धावांनी अडखळत विजय

अतीतटीच्या सामन्यात भारताचा हाँगकाँगवर 26 धावांनी अडखळत विजय

भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँगवर 26 धावांनी विजय मिळवला. सलामीवीर निझाकत खान (92) आणि कर्णधार अंशुमन रथ (73) यांनी 174 धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. खलील अहमदने आणि युझवेंद्र चहलने सर्वाधिक प्रत्येकी 3-3 बळी टिपले. सलामी भागीदारीमुळे एका क्षणी भारत हा सामना गमावतो की काय, अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर हे दोघेही पाठोपाठ बाद झाले.
1 ऑक्टोबरला होणार बांबू शेती कार्यशाळा

1 ऑक्टोबरला होणार बांबू शेती कार्यशाळा

राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत ग्रामीण भागात बांबू शेतीला प्रोत्साहन मिळून खासगी जमिनीवर बांबू लागवड वाढावी, यासाठी जळगाव येथे कार्यशाळा घेतली जाणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी ही कार्यशाळा होणार असून मुख्यमंत्री  फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. नॅशनल बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम.के.पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकरांनी दिली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more