Short News

अटलजींच्या अस्थींना  यमुना नदीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही - बजरंग दल

अटलजींच्या अस्थींना यमुना नदीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही - बजरंग दल

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे उत्तर प्रदेशमधील विविध नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. मात्र, अटलजींच्या अस्थी यमुना नदीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विसर्जित होऊ देणार नाही, असे बजरंग दलाने जाहीर केले आहे. यमुना नदीचा आता नाला झाला आहे आणि ती विसर्जनायोग्य नाही. यमुनेच्या स्वच्छतेसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. 
गरबा खेळायला लावणारे लवयात्री मधील 'ढोलिडा' गाणे प्रदर्शित

गरबा खेळायला लावणारे लवयात्री मधील 'ढोलिडा' गाणे प्रदर्शित

सलमान खानच्या बहिणीचा पती आयुष शर्मा 'लवयात्री' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, ते पाहता नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याचाच विचार मनात येत आहे. 'ढोलिडा' असे बोल असणाऱ्या या गाण्याची चाल आणि त्यात पाहायला मिळणारे रास गरब्याचं नृत्य तुम्हालाही त्या तालावर थिरकायला भाग पाडेल असंच आहे.
घुसखोरीचा डाव उधळला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा;  1 जवान शहीद

घुसखोरीचा डाव उधळला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान शहीद

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. सुरक्षा दलांनी सोमवारी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे घुसखोरीचा डाव भारताच्या सतर्क जवानांनी उधळून लावला. सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
फुंडकरांच्या रिक्त जागेसाठी अडसड यांचा अर्ज दाखल

फुंडकरांच्या रिक्त जागेसाठी अडसड यांचा अर्ज दाखल

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधानाने रिक्त झालेली विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून माजी आमदार आणि अमरावती भाजप नेते अरुण अडसड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण अडसड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , संसदीय मंत्री कामकाज मंत्री गिरीश बापच उपस्थित होते. अडसड दोनवेळा विधानसभेचेच आमदार होते.  
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more