Short News

महाजनांवर नगर, धुळे, नंदुरबारमधील निवडणुकांची जबाबदारी

महाजनांवर नगर, धुळे, नंदुरबारमधील निवडणुकांची जबाबदारी

जळगाव महापालिकेत भाजपला ऐतिहासिक 57 जागांसह एकहाती निर्विवाद सत्ता मिळवून देणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आता पक्षाने धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर येथील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी सोपवली आहे. या निवडणुकांमध्येही आपण पक्षाला ‘फिफ्टी प्लस' शब्द दिला आहे, असे महाजन यांनी शनिवारी सांगितले. येथील ‘वसंत स्मृती' कार्यालयात शनिवारी भाजपची बैठक झाली. 
तिसऱ्या मजल्यावरुन पडून 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

तिसऱ्या मजल्यावरुन पडून 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी शहरातील इस्लामपुरा भागात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून एका 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तकदीस सईद अहमद असे या मुलीचे नाव असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तकदीस इमारतीच्या सज्ज्यातून बाहेर डोकावत असतानाच तोल गेल्याने ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. तिला तात्काळ नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.   
अनुष्काला पाहाताच 'ती' लागली रडू, अन्..

अनुष्काला पाहाताच 'ती' लागली रडू, अन्..

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 'सुई-धागा', या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोलकात्याला गेली असता तिला एक सुरेख अनुभव आला. आपली आवडती अभिनेत्री अनुष्काला पाहाताच एक चाहती रडू लागली होती. मंजिष्ठा करमाकर (19) असे या मुलीचे नाव आहे. तिचे अश्रू पाहून अनुष्काही भारावून गेली. 
अजय देवगनने पत्नी काजोलचा नंबर ट्विटरवर केला  पोस्ट

अजय देवगनने पत्नी काजोलचा नंबर ट्विटरवर केला पोस्ट

अभिनेता अजय देवगनने पत्नी काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केल्यामुळे खळबळ माजली आहे. अजयचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजयने संध्याकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी ट्विट केले. काजोल देशाबाहेर आहे. पुढील क्रमांकावर तिच्याशी व्हॉट्सअॅपवरुन समन्वय साधा असे अजयने म्हटल आहे. यावर सोशल मीडिया य़ुझर्संनी ट्रोल केले. परंतु पोस्ट केलेला नंबर हा काजोलचा असल्याचे सांगितले जात आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more