Short News

आरक्षणासाठी धनगर  युवकाची आत्महत्या

आरक्षणासाठी धनगर युवकाची आत्महत्या

मराठा समाजापाठोपाठ आत्महत्येचे लोण धनगर समाजातही पसरण्याचे चित्र दिसत आहे. परभणी जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षण मागणीवरुन युवकाने आत्महत्या केली आहे. सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील 19 वर्षीय योगेश राधाकिशन कारके युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास योगेश या धनगर समाजाच्या युवकाने आत्महत्या केली. योगेश च्या नातेवाईक सेलू पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. 
...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या   : काँग्रेसचे आव्हान

...मगच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचे आव्हान

मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या, असे आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले होते.
स्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन

स्वातंत्र्यदिन दररोज साजरा करायला हवा – रविना टंडन

देश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. रविना सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोखठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येते. या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो.
ब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने  तिघांना चिरडले

ब्रिटनच्या संसदेजवळ कार चालकाने तिघांना चिरडले

लंडनमधला सर्वाधिक सुरक्षित भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. या तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी कार चालक युवकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील केला असून कसून चौकशी सुरू आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more