Short News

मोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने

मोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेला सकाळी 8 ते 9 दरम्यानच्या 9 लोकलफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. रिक्त जागा भरण्यासह इतर मागण्यांबाबतची बैठक काल, गुरुवारी फसल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सुरू आहे.
'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'

'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे. 
Asian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक

Asian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक

भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे. 
इराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट

इराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट

इराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more