Short News

गणेशोत्सवावरून शिवसेना-मनसे आमने-सामने

गणेशोत्सवावरून शिवसेना-मनसे आमने-सामने

मुंबई महापालिकेने गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मंडळांना परवानगी नाकारल्याने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा, असे सूचना त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांआधी गिरगावच्या खेतवाडीत जाऊन गणेश मंडळ अध्यक्षांची भेट घेतली होती. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. 
मुंबई महानगर प्रदेशात १ लाख २० हजार फ्लॅट्स विक्रीविना पडून

मुंबई महानगर प्रदेशात १ लाख २० हजार फ्लॅट्स विक्रीविना पडून

मुंबई आणि आसपासच्या परिसरात स्वतःच हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न. मात्र गगनाला भिडलेल्या घरांच्या किंमती, घराच्या गुंतवणुकीतून सध्या अपेक्षित न मिळणारा परतावा यामुळे अनेक फ्लॅटस विक्री विना पडून आहेत. मालमत्ता सल्लागार कंपनी नाईट फ्रँकच्या सर्वेनुसार जून २०१८ पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात १ लाख २० हजार फ्लॅटस विक्रीविना पडून आहेत.
पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे खासदार-आमदार सरसावले

पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे खासदार-आमदार सरसावले

केरळमध्ये पूरस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीत झालेलं भयंकर नुकसान लक्षात घेता राहुल गांधी यांनी मदतीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. त्यानंतर पक्षातील खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्य आपलं एका महिन्याचं वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहेत. पक्षाच्या महासचिव, राज्य प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांच्या बैठकीत पूरग्रस्तांना शक्य त्या पद्धतीनं मदत करण्याचं आवाहन केलंय.
भारत वि. इंग्लंड तिसरी कसोटी: पुजारा बाद, उपहारापर्यंत भारत 3 बाद 82

भारत वि. इंग्लंड तिसरी कसोटी: पुजारा बाद, उपहारापर्यंत भारत 3 बाद 82

भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी सामन्यात भारताने चांगली सुरूवात केली पण नंतर भारताने तीन बळी लवकर गमावले. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने भारताला तीन धक्के दिले. भारताकडून शिखर धवनने 35, लोकेश राहुलने 23 तर पुजाराने 14 धावा करून बाद झाले. भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या 4 धावांवर खेळत आहे. उपहारापर्यंत भारताने 82 धावा केल्या असून तीन विकेट गमावल्या.  
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more