Short News

लघुशंकेला गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार , 2 जण अटकेत

लघुशंकेला गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार , 2 जण अटकेत

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळच्या वेस्टर्न कोल फिल्डच्या खाणीत लघुशंकेसाठी गेलेल्या 24 वर्षांच्या तरुणीवर 4 नराधमांनी बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या नागपूरात रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी साधे शौचालयही नसल्याने हा अनर्थ घडल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला. 
विजय मल्ल्याच्या व्यंगचित्रावरुन काँग्रेसचा भाजपवर निशाणा

विजय मल्ल्याच्या व्यंगचित्रावरुन काँग्रेसचा भाजपवर निशाणा

9 हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. #जन की बात असा मथळा देत एक व्यंगचित्र काँग्रेसने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली हे मंगळागौरीतला एक पारंपारिक खेळ खेळताना दिसत आहेत. तर विजय माल्ल्या विदेशात पळताना दाखवला आहे. 
निपाणीजवळ मोटार अपघातात विटा येथील एक ठार

निपाणीजवळ मोटार अपघातात विटा येथील एक ठार

राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी (निपाणी) येथे मोटार अपघातात एकजण ठार तर 4जण जखमी झाले. जयेंद्र रवींद्र लिमये (30) असे मृताचे नाव आहे. विद्याधर कुलकर्णी (32), विकास रत्नाकर जोग (44),महेश मुकुंद इनामदार (27), तेजस दत्तात्रय कुलकर्णी (31) अशी जखमींची नावे आहेत. जयेंद्र यांच्यासह सर्वजण मिळून मोटारीने गोव्याला गेले होते. सोमवारी रात्री उशीरा ते गोव्याहून विटयाच्या दिशेने निघाले होते. 
India vs Hong Kong  : शिखर धवनने झळकवले 26 वे अर्धशतक

India vs Hong Kong : शिखर धवनने झळकवले 26 वे अर्धशतक

भारताचा पहिला सामना हाँगकाँगच्या संघाविरुद्धात होत आहे. हाँगकाँगने संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दरम्यान भारताचा सलामीवीर शिखर धवने आपले अर्धशतक झळकावले आहे. भारताने 96 धावा पूर्ण केल्या आहेत. शिखरची आपल्या कारकिर्दीतील 26 वे अर्धशतक होते. मात्र कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 23 धावांवर बाद झाला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more