Short News

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, नागरिकांमध्ये आनंद

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, नागरिकांमध्ये आनंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वाईच्या गणपती मंदिरात पाणी आले आहे. कृष्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. वरुण राजाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये आनंद आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत.
Asia Cup 2018 : पाकिस्तानचा संघ 162 धावात गारद

Asia Cup 2018 : पाकिस्तानचा संघ 162 धावात गारद

आज भारत-पाकिस्तानचा सामना होत आहे. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आत्मविश्वासासह भारतीय संघ मैदानात उतरला. भारताने दमदार सुरुवात करत पाक संघाची सलमीवीर जोडी स्वस्तात माघारी पाठवली. सुरुवातीचे दोन विकेट्स भुवनेश्वर कुमारने घेतल्या.भारतीय गोलंदाजांनी 162 धावात  पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला.
भारत -पाक सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत

भारत -पाक सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत

आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चागंली सुरुवात केली. मात्र एक चिंतेची बाब ही आहे. ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्य़ा गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आले. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताना पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचेही दिसून आले. अखेर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले . 
गायी अन् माकडाच्या तोंडून संस्कृत व तामिळ वदवेल : स्वामी नित्यानंद

गायी अन् माकडाच्या तोंडून संस्कृत व तामिळ वदवेल : स्वामी नित्यानंद

सेक्स सीडीमुळे चर्चेत आलेले स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वामी नित्यानंद यांनी गाय, माकड, सिंह आणि इतर प्राणी भविष्यात तामिळ आणि संस्कृतमध्ये लोकांशी संवाद साधू शकतील असा दावा केला आहे. स्वामी नित्यानंद यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्रमातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. वर्षभरात  प्राण्यांच्या तोंडून संस्कृत आणि तामिळ भाषा वदवेल,असे ते म्हणाले. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more