Short News

सगळेच विरोध असताना भाजप जिंकूच कशी शकते?- उद्धव ठाकरे

सगळेच विरोध असताना भाजप जिंकूच कशी शकते?- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत म्हणूनच ते एकापाठोपाठ एक अशा निवडणुका जिंकत आहेत. राज्यात इतका असंतोष असतानाही भाजपच जिंकते, असे या मंडळींचे म्हणणे आहे, पण राज्यातशेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय आहे, अशी भूमिका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त मांडण्यात आली आहे.
तब्बल महिन्याभरानंतर मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

तब्बल महिन्याभरानंतर मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

तब्बल महिनाभर दडी मारलेल्या पावसाने पुन्हा सुर धरल्याने बळीराजा सुखावला आहे. राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, काही ठिकाणी चक्रीवादळाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
लडाखमधून चिनी सैनिकांची माघार; तंबूही हटवले

लडाखमधून चिनी सैनिकांची माघार; तंबूही हटवले

लडाखच्या पूर्वेकडील डेमचोक सेक्टरमध्ये भारतीय सीमेवर जवळपास ४०० मीटरपर्यंत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांनी तब्बल एका महिन्यानंतर माघार घेतली आहे. सूत्रांनुसार, चिनी सैनिकांनी उभारलेले पाच तंबूही हटवण्यात आले आहेत. पुढील महिन्यात चीनचे संरक्षण मंत्री भारतात येणार आहेत. त्यांच्यासोबतच्या होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचं सांगण्यात येतं.
इटलीमध्ये अचानक १२ महिन्यांची आणीबाणी

इटलीमध्ये अचानक १२ महिन्यांची आणीबाणी

इटलीच्या जिनोआ येथे एक पूल कोसळल्याने ३९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर तातडीने पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांनी १२ महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. या घटनेच्या चौकशी आणि बचाव कार्यासाठी ५० लाख यूरो म्हणजे जवळपास ४० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असं कॉन्टे म्हणाले. या पुलाची देखरेख करणारी कंपनी ऑटोस्ट्रेडवर कारवाई करण्यात येणार आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more