Short News

फार्महाऊसवर गोळीबारीचा सराव केला- पांगरकरची कबुली

फार्महाऊसवर गोळीबारीचा सराव केला- पांगरकरची कबुली

जालन्याचे माजी नगरसेवक खुशालसिंह राणा ठाकूर यांच्या रेवगाव शिवारातील फार्म हाऊसची एटीएसने रविवारी झाडाझडती घेतली. याच फार्म हाऊसवर बॉम्ब तयार करण्याचा आणि पिस्तूल चालविण्याचा सराव केल्याची कबुली माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने दिल्याची सूत्रांची माहिती आहे, त्यानंतर एटीएसने हा परिसर पिंजून काढलाय. जालना बायपासने अंबड रोडवरील रेवगावजवळ माजी नगरसेवक राणा ठाकूर यांची 22 एकर जमीन आहे.
सांगली गर्भपात प्रकरणी दुसरा संशयित डॉक्टर अटकेत

सांगली गर्भपात प्रकरणी दुसरा संशयित डॉक्टर अटकेत

गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले पाठोपाठ दुसरा संशयित डॉ. विजयकुमार चौगुलेलाही अटक करण्यात आलीय. चौगुलेला सांगली न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. सांगली महापालिकेने चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द केलाय. या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान तिसरा संशयित डॉ. स्वप्नील जमदाडेचा शोध सुरू आहे.
गोव्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेस आणणार अविश्वास ठराव

गोव्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेस आणणार अविश्वास ठराव

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्यामुळं त्यांच्या जागी नवं नेतृत्व निवडण्याबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. पर्रिकर यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदे्शाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर या गोव्यातील तिनही खासदारांशी काल दिल्लीत सुमारे अडीच तास चर्चा केली.
सुबोध भावेच्या 'शुभ लग्न सावधान' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

सुबोध भावेच्या 'शुभ लग्न सावधान' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

सुबोध भावेसोबत अभिनेत्री श्रुती मराठे स्क्रिन शेअर करणार आहे. ही जोडी 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाद्वारे ही जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या सिनेमातील एक गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील या गाण्याला मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलं.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more