Short News

मुंबईतील मराठा आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट

मुंबईतील मराठा आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट

मुंबईतील मराठा आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. काही कार्यकर्त्यांना बंद व्हावा असे वाटत आहे. तर काहींनी ठिय्या आंदोलनाद्वारे रोष व्यक्त करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार गुरुवारी कार्यकर्त्यांचा एक गट वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते २ या कालावधीत ठिय्या आंदोलन करणार आहे. तर दुसरा गट बंद पुकारणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’चा ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार

‘चला हवा येऊ द्या’चा ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार

गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे.
कसोटीमध्ये मी सलामीही करू शकतो - रोहित शर्मा

कसोटीमध्ये मी सलामीही करू शकतो - रोहित शर्मा

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सलामीची समस्या भेडसावत आहे. कारण शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ चांगल्या सलामीवीराच्या शोधात आहे. त्याचवेळी भारताचा क्रिकेटपटूरोहित शर्माने मी भारतासाठी कसोटीमध्ये सलामी करण्यातासाठी तयार आहे, असे म्हटले आहे.
प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेन्ड निक जोनास कुटुंबासह मुंबईत

प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेन्ड निक जोनास कुटुंबासह मुंबईत

प्रियांका चोप्राने येत्या १८ आॅगस्टला मुंबईत आयोजित केलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब सहभागी होणार, ही बातमी आम्ही याआधीचं तुम्हाला दिली होती. त्यानुसार, निक जोनास व त्याचे कुटुंब भारतात पोहोचले. आज मुंबई विमानतळावर निक दिसला. प्रियांकाने आयोजित केलेल्या या पार्टीत प्रियांका व निकच्या लग्नाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more