Short News

मराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपती

मराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपती

आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी कोल्हापुरात दिला.सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर यल्गार सभेत ते बोलत होते. हा आवाज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवावा लागेल. कारण केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने लवकर आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. 
गांजा विकणाऱ्या  5 महिला तस्कर  मुंईत अटक

गांजा विकणाऱ्या 5 महिला तस्कर मुंईत अटक

मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने 5 महिला तस्करांना अटक केली आहे. या महिलांकडून 7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. कमली शिंदे, शशिकला शिंदे, पार्वती धनगर, कमला कपूर आणि मेरी अर्जुन अशी अटक करण्यात आलेल्या महिला तस्करांची नावे आहेत. या अटक तस्कर महिला गोरेगाव व कांदिवली परिसरातील महाविद्यालयीन मुलांना गांजा विकत होत्या. यातील दोन महिला तस्करांना या आधीही अटक करण्यात आली होती.
वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार

वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार

नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर माहिती बाहेर येऊ नये म्हणून आरोपींनी पीडित महिलेला दगडाने ठेचून मारहाण केल्याची संतापजनक कृत्यही त्यांनी केले. या घटनेने नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेला नागपूरच्या आरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला 100 कोटी अनुदान

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला 100 कोटी अनुदान

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील आमराई क्लबमधी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more