Short News

मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको : अजित पवार

मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको : अजित पवार

आघाडी सरकार असताना मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण देताना ५२ टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लागू दिला नाही. त्यावेळेस नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, त्यावेळेसच्या चर्चेनुसार मराठा समाजाला नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण हवे आहे असून राजकीय आरक्षण नको, असे सांगितल्याचे 'राष्ट्रवादी'चे नेते अजित पवार यांनी सांगितले.
केरळात महापुरामुळे 167 जणांचा बळी;  आठ हजार कोटींचे नुकसान

केरळात महापुरामुळे 167 जणांचा बळी; आठ हजार कोटींचे नुकसान

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर झाला आहे. या पुरामुळे सर्वाधिक हानी झाली आहे. जनजीवन ठप्प झाले आहे. पुरातील बळींची संख्या 167 वर पोहोचली आहे. पिके आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. एकूण आठ हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांत रेड अॅलर्ट जाहीर केल्याची माहिती मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली .
अजित वाडेकरांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

अजित वाडेकरांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसुमादाय लोटला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. मुंबईतील जसलोक रुग्णालयात बुधवारी अजित वाडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. 
'मोदी सरकार आणि इम्रान खान यांनी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करावे'

'मोदी सरकार आणि इम्रान खान यांनी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करावे'

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. वाजपेयींना पाकिस्तानसोबत मैत्री करायची होती. पण दुर्दैवाने हे प्रत्यक्षात झाले नाही. आता देशातील मोदी सरकार आणि पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करावे. वाजपेयींसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more