Short News

मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

सकल मराठा समाजातर्फे संपूर्ण नागपुरात आज क्रांतीदिनी बंद पाळण्यात येत आहे. शहरातील शिवाजी स्मारकाजवळ संपूर्ण मराठा बांधव एकत्रित आले आहेत. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. सकाळी शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे महाआरती करण्यात आली. या महाआरती नंतर सकल मराठा समाजाच्या मोर्चाची सुरूवात करण्यात आली. 
रमेश पोवारची भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदी निवड

रमेश पोवारची भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदी निवड

भारतीय महिला टीमच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. रमेश पोवार हा भारतीय महिला टीमचा नवा प्रशिक्षक असणार आहे. टी-20 वर्ल्ड कपपर्यंत रमेश पोवारची भारतीय टीमचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारला भारतीय महिला टीमचा अंतरिम प्रशिक्षक करण्यात आले होते.
एका चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज तैनात

एका चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज तैनात

जपानमध्ये चोरी आणि बलात्काराचा गुन्हा असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलीस ठाण्यातून पोलीस अधिका-याचे बूट चोरुन पळ काढला आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. जूनया हिदा असे या चोरट्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. 
वेब सिरीज हातातून गेल्याने इरफान नाराज

वेब सिरीज हातातून गेल्याने इरफान नाराज

बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. अलिकडेच इरफान खानने सहावा आणि शेवटचा किमो पूर्ण केल्याची माहिती समोर आली होती. आता इरफान खानबद्दल अजून एक मोठी खबर समोर येत आहे. आपल्या आजारपणामुळे इरफान वेब सिरीज Gormint मधून बाहेर पडला. याबद्दल खुद्द इरफानने सोशल मीडियावर पोस्ट लिहीली. अॅमेझॉन प्राईमच्या बॅनर अंतर्गत या वेब सिरीजची निर्मिती होत होती. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more