Short News

महोदय! दिलेला शब्द पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

महोदय! दिलेला शब्द पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तेवत असतानाच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. समाजाला दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री कार्यालय आणि गृह विभागाला दिले आहे. हे निवेदन आंदोलनात अग्रेसर राहिलेल्या परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्यवक महेश डोंगरे यांनी दिले आहे. 
औरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग

औरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग

चिकलठाणा एमआयडीसीतील एअर कुलर बनविणाऱ्या आनंद इंडस्ट्रीज या कंपनीला शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने महावितरणचे "शटडाऊन' असल्याने जीवितहानी टळली आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे कंपनीच्या मागे कुंदन शिवाजी रेड्डी यांच्या मालकीची आनंद इंडस्ट्रीज कंपनी आहे.   
अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीने अजामीनपात्र वॉरंटविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मेहुल चोक्सीने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. सीबीआय न्यायालय आणि त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने मेहुल चोक्सी व अन्य पाच जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना चुना लावल्याचा आरोप आहे. 
'प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला धर्मनिरपेक्षता शिकवू नये'

'प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला धर्मनिरपेक्षता शिकवू नये'

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिपमध्ये सध्या वातावरण तापलेले दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ते धर्मनिरपेक्ष आहेत, असं तेव्हा वाटत होतं. आता वाटत नाहीत, असा टोला अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more