Short News

मराठा आरक्षण पेटले, नांदेडमध्ये तहासिलचे रेकॉर्ड रूम जाळले

मराठा आरक्षण पेटले, नांदेडमध्ये तहासिलचे रेकॉर्ड रूम जाळले

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मराठवाड्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. जिल्ह्यातील लोहा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. लोहा येतील तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात जातीच्या संचिका जाळण्यात आल्या आहेत. पूर्णा येथे रेल्वेवर दगडफेक करण्‍यात आल्याची माहिती मिळाली आहे.
गोंदियातील चार युवकांचा बुडून मृत्यू

गोंदियातील चार युवकांचा बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे चार युवक लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा येथील जलाशयात सहलीसाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. चार ही युवक गोंदिया मधील कटंगी इथले रहिवासी होते. यामधे गोलू राठौर वय वर्षे २३, दुर्गेश भूसे वय २३ , विल्सन विजय मदारे वय १९ या तिघांचे मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात आले आहेत.
अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

भारतीय बहुजन पक्षाचे नेते आसिफ खान यांच्या हत्येने अकोला शहर हादरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी राजकीय हत्या आहे. १६ ऑगस्टपासून आसिफ खान बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. अखेर पूर्णा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु. या संशयितांची नावे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण, पुण्यात 'जवाब दो' रॅलीला सुरुवात

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण, पुण्यात 'जवाब दो' रॅलीला सुरुवात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण होत असून हत्येमागील मास्टरमाईंड अजूनही सापडत नाही. याच्या निषेधार्थ पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘जवाब दो' निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, मेधा पानसरे हे या रॅलीत सहभागी झाले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more