Short News

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, विकृत दाम्पत्याला अटक

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, विकृत दाम्पत्याला अटक

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुंबईतील विकृत व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईला देखील अटक केली असून पैशापोटी तिने स्वत:च्याच मुलीला या दाम्पत्याच्या घरी पाठवले होते. जुहू येथे राहणारी १४ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाली होती. मुलीच्या आईने ही तक्रार दाखल केली होती.
कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम: अध्यक्ष

कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम: अध्यक्ष

'कॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात बँकेच्या कोअर बँकिंग यंत्रणेवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे खातेदारांची खाती व माहितीही सुरक्षित आहे. त्यामुळे खातेदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,' असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केले आहे. 'बँक दर वर्षी बँकेचा सर्व्हर व अन्य यंत्रणांचे सायबर ऑडिट करून घेत असते.
व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट

त्यांचे लग्न टिकले अवघे चार महिनेच... एकमेकांबरोबर पटत नसल्यामु‌ळे ते वेगळे झाले... तो अमेरिकेत गेला; तर ती जर्मनीमध्ये... दोघांनी पुणे फॅमिली कोर्टात परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला...व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष नोंदवून भारतात न येताच त्यांचा वेगळा होण्याचा मार्ग मोकळा झाला... फॅमिली कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
अटल बिहारी वाजपेयींचे पार्थिव भाजपा मुख्यालयात, मोदींनी घेतले अंत्यदर्शन

अटल बिहारी वाजपेयींचे पार्थिव भाजपा मुख्यालयात, मोदींनी घेतले अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी दिल्लीतील निवासस्थानातून भाजपा मुख्यालयाकडे रवाना झाले. तिथे सर्वसामान्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more