Short News

रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार  नाही -रावते

रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार नाही -रावते

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी रावतेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दरवाढ होणार नसल्याची ग्वाही दिल्याचे ग्राहक पंचायत प्रतिनिधींनी सांगितले. मंगळवारी झालेल्या या बैठकीला परिवहन सचिव परिवहन आयुक्त उपस्थित होते. 
परभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा

परभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा

'संविधान बचाओ, देश बचाओ' या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांची परभणीत 24 ऑगस्टला तर पाथरीत 25 ऑगस्टला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी शुक्रवारी (ता.17) पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, शेकाप,भारिप बहुजन महासंघ यांच्यासह विविध 52 संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने परभणीत कन्हैयाकुमार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 
केरळातील वादळाचा कोकणातील मच्छीमारीला फटका

केरळातील वादळाचा कोकणातील मच्छीमारीला फटका

केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. सलग पाच दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून दहा ते बारा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सुरवातीपासूनच मच्छीमारी हंगामावरील वादळाचे सावट कायम राहिले आहे. वेगवान वार्‍यामुळे समुद्र खवळला असून आणखीन चार दिवस हेच वातावरण राहिल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर पहिले तीन दिवस कोळंबी, लेप, पापलेट, आणि बांगडा मिळत होता.
केरळमधील पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड  कलाकारांचा मदतीचा हात

केरळमधील पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांचा मदतीचा हात

केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पूरामुळे सामान्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी देखील अधिकाधिक सहयोग देण्याचे आवाहन केले. पावसामुळे आतापर्यंत सुमारे 167 जणांचे बळी गेले आहेत. या पूरपरिस्थितीत बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपत्ती काळात मदतीसाठी आवश्यक ती माहिती शेअर केली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more