Short News

पंतप्रधानांकडून 'आयआयटी मुंबई'ला एक हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर

पंतप्रधानांकडून 'आयआयटी मुंबई'ला एक हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील आयआयटीच्या ५६ व्या वार्षिक पदवीदान समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी 'आयआयटी मुंबई' या शिक्षण संस्थेला १ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केलीय. ५६ व्या पदवीदान समारंभात भाषणादरम्यान मोदींची ही घोषणा केलीय. यावेळी त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं तोंडभरून कौतुकही केलंय.
वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास

वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास

सीमेच्या रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या जवानांच्या वीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास देण्यात येतात. आतापर्यंत ६३९ वीरपत्नींना याप्रकारे पास देण्यात आले आहेत. त्यात, सातारा जिल्ह्यातील ९० वीरपत्नींना पास देण्यात आले असून मुंबईत १२ पास सुपूर्द करण्यात आले आहेत. एसटी महामंडळाने सीमेवर प्राणाची आहुती दिलेल्या जवानांच्या पत्नींसाठी बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना लागू केली आहे.
रुपयाची घसरण हाताळण्यासाठी देशाकडे मुबलक परकीय चलन साठा – जेटली

रुपयाची घसरण हाताळण्यासाठी देशाकडे मुबलक परकीय चलन साठा – जेटली

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्याने अभूतपूर्व नीचांकी पातळी गाठल्याच्या एक दिवसानंतर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय चलनातील अस्थिरता हाताळण्याइतका मुबलक परकीय चलन गंगाजळी असल्याचा दावा केला. चलन बाजारातील हालचालींवर बारकाईने देखरेख ठेवली जात असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
अतिवृष्टीमुळे केरळमध्ये पुन्हा हाहाकार; कोची विमानतळ पाण्याखाली

अतिवृष्टीमुळे केरळमध्ये पुन्हा हाहाकार; कोची विमानतळ पाण्याखाली

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये पुन्हा हाहाकार माजला असून, पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेरियार नदीवरील धरणाचे गेट उघडण्यात आल्याने कोची विमानतळ पाण्याखाली गेले असून, शनिवारपर्यंत विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याशिवाय रस्ते, रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक भागांतील वाहतूक बंद पडली आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more