Short News

औरंगाबादेत 4 उद्योग समूहांच्या 80 मालमात्तांवर प्राप्तिकरचे छापे

औरंगाबादेत 4 उद्योग समूहांच्या 80 मालमात्तांवर प्राप्तिकरचे छापे

प्राप्तिकर विभागाने औरंगाबादेतील 4 उद्योगसमूहांवर मंगळवारपासून कारवाई सुरू केली आहे. या उद्योगांच्या देशातील 80 मालमत्तांवर छापे टाकण्याची ही मोहीम शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. औरंगाबादमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात प्राप्तिकर विभागाची कारवाई झाली. या चारही उद्योगसमूहांची आर्थिक उलाढाल मोठी असून देशभरातील 12 ठिकाणी असलेल्या त्यांच्या मालमत्तांची माहिती आधी प्राप्तिकर विभागाने मिळवली.
मुंबईत मोबाइल चोरणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

मुंबईत मोबाइल चोरणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात सकाळपासून चाकरमानी आपल्या रोजीरोटीसाठी घराबाहेर पडतात आणि रेल्वेने प्रवास करतात. त्याचवेळी परराज्यातून आलेले चोरटेही लोकलच्या गर्दीच्या वेळी मोबाईल चोरण्यासाठी बाहेर पडतात. गर्दीचा फायदा उचलून मोबाइल लांबवणारे दिल्लीतील दोन चोरटे गजाआड झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. हे चोरटे दोन तीन साथीदारांच्या मदतीने मोबाइल लांबवतात.
भाजपला तुकाराम मुंढें पडले भारी

भाजपला तुकाराम मुंढें पडले भारी

सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंना आवर घालवण्यात भाजपसह सर्वपक्षीय नेते यशस्वी ठरले असतांना, नाशिकमध्ये मात्र मुंढें हेच भाजपला भारी पडले आहेत.मुढेंनी अवघ्या सात महिन्यात सत्ताधारी भाजपला पूर्णत: डॅमेज केले आहे.मुंढेंच्या कार्यशैलीमुळे आता भाजपचे आमदार,पदाधिकारी आणि नगरसेवक एकमेकांचे दुश्मन बनले असून लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये आम्हाला आता विचारू नका असा इशाराच त्यांनी पक्षाला देवून टाकला आहे.
'वडा पाव' विकण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरला अभिषेक बच्चनचे प्रत्युत्तर

'वडा पाव' विकण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरला अभिषेक बच्चनचे प्रत्युत्तर

अभिनेता अभिषेक बच्चन दोन वर्षानंतर 'मनमर्जिया' चित्रपटात झळकला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करु शकला नसला तरी सर्वच समिक्षकांना चित्रपट आवडला आणि त्यांनी चांगले रँकींगही दिले. मात्र सोशल मीडियावर या अपयशाला अभिषेक बच्चन जबाबदार असल्याचे सांगत त्याची खिल्ली उडवली जातेय. एका युजरने तर त्याला वडा पाव विकण्याचा सल्ला दिलाय.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more