Short News

वाजपेयींचे निधन नक्की 16 ऑगस्टलाच झालं का?, संजय राऊतांना 'वेगळीच' शंका

वाजपेयींचे निधन नक्की 16 ऑगस्टलाच झालं का?, संजय राऊतांना 'वेगळीच' शंका

शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 16 ऑगस्टच्या दिवशीच अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते की या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा एम्सकडून 16 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यांच्या निधनाची वेळदेखील सांगण्यात आली होती.
निपाणीजवळ मोटार अपघातात विटा येथील एक ठार

निपाणीजवळ मोटार अपघातात विटा येथील एक ठार

राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी (निपाणी) येथे मोटार अपघातात एकजण ठार तर 4जण जखमी झाले. जयेंद्र रवींद्र लिमये (30) असे मृताचे नाव आहे. विद्याधर कुलकर्णी (32), विकास रत्नाकर जोग (44),महेश मुकुंद इनामदार (27), तेजस दत्तात्रय कुलकर्णी (31) अशी जखमींची नावे आहेत. जयेंद्र यांच्यासह सर्वजण मिळून मोटारीने गोव्याला गेले होते. सोमवारी रात्री उशीरा ते गोव्याहून विटयाच्या दिशेने निघाले होते. 
India vs Hong Kong  : शिखर धवनने झळकवले 26 वे अर्धशतक

India vs Hong Kong : शिखर धवनने झळकवले 26 वे अर्धशतक

भारताचा पहिला सामना हाँगकाँगच्या संघाविरुद्धात होत आहे. हाँगकाँगने संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दरम्यान भारताचा सलामीवीर शिखर धवने आपले अर्धशतक झळकावले आहे. भारताने 96 धावा पूर्ण केल्या आहेत. शिखरची आपल्या कारकिर्दीतील 26 वे अर्धशतक होते. मात्र कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 23 धावांवर बाद झाला आहे. 
10 रुपयांत उघडा पोस्टात खाते अन् मिळवा अधिक व्याजदर

10 रुपयांत उघडा पोस्टात खाते अन् मिळवा अधिक व्याजदर

आता भारतीय पोस्टाने अशीच एक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. त्यानुसार , केवळ 10 रुपयांत पोस्टात खाते उघडले जाऊ शकते. पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात हे खाते खोलता येईल. केवळ 10 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येऊ शकते. या खात्यावर ग्राहकांना 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more