Short News

शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, गावकर्‍यांची जिल्हाधिकार्‍यांना मारहाण

शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, गावकर्‍यांची जिल्हाधिकार्‍यांना मारहाण

नंदूरबारमधील सलसाडी शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा शॉक लागून सोमवारी मृत्यू झाला आहे. सचिन चंद्रसिंग मोरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सचिन पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. या घटनेनंतर गावकरी आणि पालक संतप्त झालेत. घटनेची माहिती मिळताच आश्रम शाळेत पाहाणी करण्‍यासाठी गेलेले सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांना संतप्त गावकर्‍यांनी मारहाण केली. 
मोदींच्या स्वच्छ भारतात अजूनही सफाई कामगार हाताने मैला वाहतात - राहूल गांधी

मोदींच्या स्वच्छ भारतात अजूनही सफाई कामगार हाताने मैला वाहतात - राहूल गांधी

गटार सफाईचे काम करताना गुदमरून मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्याबद्दल देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. याच मुद्यावरून राहुल गांधीनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. मोदींची स्वच्छ भारत योजना म्हणजे निव्वळ घोषणाबाजी आहे. हजारोंच्या संख्येने हाताने मैला साफ करणाऱया 'स्वच्छ भारता'च्या सफाई कामगारांकडे मोदी सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत त्यांनी स्वच्छ भारत योजनेवर टीका केली.
राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे

राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे

तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर आता राम मंदिराचाही अध्यादेश काढा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ''तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुस्लिम स्त्रीयांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल,असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही सूर्योदय होईल हे पाहावे.
भारत-पाक शांती चर्चेसाठी इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

भारत-पाक शांती चर्चेसाठी इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचे समजते आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे शब्द टाकल्याचेही वृत्त आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more