Short News

वैभव राऊतच्या अटकेनंतर धरपकड सुरु, राज्यभरातून १२ जण ताब्यात

वैभव राऊतच्या अटकेनंतर धरपकड सुरु, राज्यभरातून १२ जण ताब्यात

नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.
सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर केली मात

सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर केली मात

आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर २१-१८, २१-१९ अशी मात करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूपुढे जपानच्या अकाने यामागुचीचं कडवं आव्हान होतं. अपेक्षेप्रमाणे सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली झुंज पहायला मिळाली.  
गोंदियातील चार युवकांचा बुडून मृत्यू

गोंदियातील चार युवकांचा बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे चार युवक लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा येथील जलाशयात सहलीसाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. चार ही युवक गोंदिया मधील कटंगी इथले रहिवासी होते. यामधे गोलू राठौर वय वर्षे २३, दुर्गेश भूसे वय २३ , विल्सन विजय मदारे वय १९ या तिघांचे मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात आले आहेत.
अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

भारतीय बहुजन पक्षाचे नेते आसिफ खान यांच्या हत्येने अकोला शहर हादरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी राजकीय हत्या आहे. १६ ऑगस्टपासून आसिफ खान बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. अखेर पूर्णा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु. या संशयितांची नावे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more