Short News

अनिकेत कोथळेचा खून पुर्वनियोजित - उज्ज्वल निकम

अनिकेत कोथळेचा खून पुर्वनियोजित - उज्ज्वल निकम

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेला अनिकेत कोथळे याचा खून हा कस्टोडियल मर्डर नसून तो पुर्वनियोजित खूनच आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल शिंगटे आणि झाकीर पट्‌टेवाले यांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज केला. जामीन अर्जावरील निर्णय 18 तारखेस होणार आहे.
रवी शास्त्रींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारावी:  हरभजन सिंग

रवी शास्त्रींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारावी: हरभजन सिंग

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासाठी प्रशिक्षक रवी शास्त्री जबाबदार असून त्याने यावर काहीतरी बोलणे गरजेचे आहे,अशी टीका माजी खेळाडू हरभजन सिंहने केली. रवी शास्त्रींची चुकलेली धोरणेच पराभवाला जबाबदार असल्याचे हरभजनचे म्हणणे आहे. भारताचा संघ सर्वोत्कृष्ट टुरिंग टीम आहे असा दावा रवी शास्त्रींनी केला होता. 
जिओ गिगा फायबरच्या नोंदणीला सुरूवात

जिओ गिगा फायबरच्या नोंदणीला सुरूवात

रिलायन्स कंपनीने आता सीम कार्ड , जिओ मोबाईल नंतर जिओ गिगा फायबर आणले आहे. जिओ गिगा फायबरच्या नोंदणीला सुरूवात होत आहे. पण ज्या शहरातून सर्वाधिक नोंदण्या येतील त्या शहराला पहिले गिगा फायबर कनेक्शन मिळेल अशीही माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीचे हे पहिले गिगा फायबर असणार आहे. गिगा फायबरमुळे ग्राहकांना आयपीटीव्ही,ब्रॉडबँड,लँडलाइन,व्हर्चुअल रिअॅलिटी गेम यांसारख्या सुविधा मिळेल.
... तर आज 'टीम इंडिया' नसती, सचिनचे भावूक अन् सेहवागचे भावनिक ट्विट

... तर आज 'टीम इंडिया' नसती, सचिनचे भावूक अन् सेहवागचे भावनिक ट्विट

देशभरात देशभक्तीचा फिव्हर आहे. क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींकडूनही देशवासियांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि माजी फलंदाज विरेंद्र सेहवागनेही देशवासियांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्याचप्रमाणे आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवणे कठीण आहे. जर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले नसते तर आज 'टीम इंडिया'ही नसती,असे भावनिक ट्विट सचिनने केले. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more