Sports Short News

भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला धुळ चारत, अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला

भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला धुळ चारत, अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला

अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले. शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार केले.
लक्ष्मीपती बालाजी चैन्नई सुपरकिंग संघांचा कोच

लक्ष्मीपती बालाजी चैन्नई सुपरकिंग संघांचा कोच

भारताचा माजी क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजी आयपीएलच्या 2018च्या पर्वामध्ये खास भूमिकेत दिसणार. चैन्नईच्या संघामध्ये महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा हे खेळाडू कायम.चैन्नई सुपरकिंगचे सीईओ के एस विश्वनाथन यांनी कार्यक्रमात संघाच्या प्रशिक्षकांची यादी घोषित केली. यानुसार स्टीफन फ्लेमिंग संघाचा कोच असेल तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माइकल हस्सी फलंदाजी कोच आणि बालाजी गोलंदाजीचे कोच असतील.
महेंद्रसिंग धोनीने केली टीम इंडियाची पाठराखण

महेंद्रसिंग धोनीने केली टीम इंडियाची पाठराखण

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने द. आफ्रिका दौ-यातील ढिसाळ कामगिरीबद्दल सध्याचा कर्णधार विराट कोहलीवर होत असलेला टीकेचा भडीमार योग्य नसल्याचे सांगून विराटची पाठराखण केली आहे. आमचा संघ २० बळी घेत असून संघाचे जे सकारात्मक पैलू आहेत त्यात गोलंदाजांची कामगिरी प्रमुख असल्याचे धोनीने सांगितले.मी सध्या भारतीय संघाला सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देईन, असेही धोनी म्हणाला.
आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ जाहीर, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार

आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ जाहीर, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार

आयसीसीने वार्षिक पुरस्कार जाहीर केल्यानंतर, आता वन डे आणि कसोटी टीमही जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघाचे नेतृत्त्व टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. विराट कोहली आयसीसीच्या वन डे आणि कसोटी संघ २०१७ चा कर्णधार असणार आहे. दोन्ही संघात भारताचे तीन-तीन खेळाडू आहेत. वन डे संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे.