Short News

Asian Game 2018 : भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

Asian Game 2018 : भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

18 व्या आशियाई स्पर्धेच्या महिला हॉकी स्पर्धेच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये तीन मिनिटात केलेल्या 3 गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी टीमने शनिवारी चॅम्पियन दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत करत सेमिफायनलमध्ये धडक दिली. भारतीय टीमचा हा लागोपाठ तिसरा विजय आहे. नवनीत कौरने 16व्या, गुरजीत कौरने 54व्या आणि 55व्या मिनिटाला तर वंदना कटारियाने 56व्या मिनिटाला गोल केला. 
मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

बिहारमधील मुझफ्फरपूर शहराचे माजी महापौर समीर कुमार (वय ५०) आणि त्यांचा चालक रोहित कुमार (४०) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी रायफलीतून एकूण १७ ते १८ फैरी झाडल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक मुकुल रंजन यांनी दिली आहे. समीर कुमार हे २००२ ते ०७या काळात मुझफ्फरपूरचे महापौर होते. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले.
कुपवाडामध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडामध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुपवाडातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून काही दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या जवानांच्या ही बाब लगेचच लक्षात आली.
मनोहर पर्रीकरच राहणार गोव्याचे मुख्यमंत्री - अमित शाह

मनोहर पर्रीकरच राहणार गोव्याचे मुख्यमंत्री - अमित शाह

गोव्यात पर्यायी नेतृत्वाची चर्चा होत आहे. मात्र, मनोहर पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, असे भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. शहा यांनी यासंदर्भात टि्वट करत, मनोहर पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील. गोवा प्रदेश भाजपच्या कोअर समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातही घोषणा करण्यात येईल. असे म्हटले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more