Short News

द्युती चंदला ओडीशा सरकारकडून 1.5 कोटींचे बक्षिस

द्युती चंदला ओडीशा सरकारकडून 1.5 कोटींचे बक्षिस

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या द्युती चंदवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ओडीशा सरकारने द्युतीच्या या कामगिरीसाठी 1.5 कोटींचे इनाम घोषित केले आहे. द्युनीतेन 100 मी. शर्यतीच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान कमावत रौप्य पदकाची कमाई केली. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने द्युतीचं सुवर्णपदक हुकले. 
पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी

पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी

स्वाईन फ्लूने शहरात आणखी १० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. तर सध्या विविध रुग्णालयांमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मागील दोन महिन्यांत शहरात स्वाईन फ्लुने कहर केला आहे. राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे.
यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे-भाजपा

यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे-भाजपा

ओलांद यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका केलेली नाही. राहुल गांधी यांनी यावेळी मर्यादा सोडली असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेस घराणं हे भ्रष्टचाराचे माहेरघर आहे असा आरोप आता भाजपाने केला.
नेपाळ लवकरच पॉर्न वेबसाईटस करणार बंद

नेपाळ लवकरच पॉर्न वेबसाईटस करणार बंद

देशात बलात्काराच्या घटना वाढत असल्यामुळे नेपाळ सरकारने पॉर्नोग्राफीक कंटेटची निर्मिती करणाऱ्या पॉर्न वेबसाईटस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही बंदी अंमलात येईल असे नेपाळ सरकारने शुक्रवारी सांगितले. पॉर्नोग्राफीक कंटेटमुळे बलात्कार वाढत आहेत असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. काही महिन्यात नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more