Short News

Asian Games 2018: स्टीपलचेसमध्ये सुधा सिंगला रौप्यपदक

Asian Games 2018: स्टीपलचेसमध्ये सुधा सिंगला रौप्यपदक

भारताची युवा धावपटू सुधा सिंगने देशाला आज रौप्यपदक पटकावून दिले. स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. सुधाने 3000 मी.हे अंतर 9 मिनिटे 40 सेकंदात पार केले. 4 सेकंदानी तिचे सुवर्णपदक यावेळी हुकले. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बेहरिनच्या यावी विनफ्रेडने हे अंतर 9.36 सेकंदांमध्ये पूर्ण केले. सुधाने यापूर्वी 2010 साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. 
आशिया कप 2018 : भारताची बांग्लादेशवर 7 विकेटने मात

आशिया कप 2018 : भारताची बांग्लादेशवर 7 विकेटने मात

आशिया कप स्पर्धेतील सुपर फोरमधल्या आजच्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर 7 विकेटने मात केली. बांग्लादेशने भारतासमोर 174 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार रोहित शर्माने शानदार नाबाद 83धावा केल्या. भारताकडून शिखर धवन (40) आणि धोनीने (33) चांगली खेळी केली. तत्पुर्वी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जाडेजाने शानदार पुनरागमन करत 4 विकेट घेतल्या तर भुवी आणि बुमराहने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या एका 11 वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधीत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला. या रुग्णालयात साफ सफाईचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केला. 
पत्नीने आत्महत्या करताच पतीनेही मारली विहिरीत उडी

पत्नीने आत्महत्या करताच पतीनेही मारली विहिरीत उडी

अमरावती येथे कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे घडली. पत्नीने गळफास घेतल्यानंतर पतीने विहिरीत उडी मारली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्याचा शोध सुरू आहे. निंभोरा बोडखा येथील सुनीता संजय दाभाडे (वय ३५) या महिलेने गावातीलच संजय दाभाडे (वय ४२) याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघेही शेती व मोलमजुरी करत होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more