Short News

Asian Games 2018: भारताच्या घोडेस्वारांची 'रौप्य' पदकापर्यंत स्वारी

Asian Games 2018: भारताच्या घोडेस्वारांची 'रौप्य' पदकापर्यंत स्वारी

फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात, तर राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व मिर्झा यांनी सांघिक गटात भारताला अश्वशर्यतीत रौप्य पदके जिंकून दिली. आशियाई स्पर्धेत तब्बल 36 वर्षांनंतर भारतीय घोडेस्वाराने वैयक्तिक गटात पदक जिंकण्याचा पराक्रम केला. घोडेस्वार फौआद मिर्झाने रौप्यपदक जिंकून दिले. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना ही विक्रमी कामगिरी केली. 1982नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले.
‘राफेल मंत्र्यां’नी राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल

‘राफेल मंत्र्यां’नी राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल

राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. आज त्यांनी पुन्हा ट्विट करीत संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप करीत हल्लाबोल केला. सीतारामन यांना राफेल मंत्री असे संबोधत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. एचएएल या स्वदेशी कंपनीला ठेका न दिल्याने राहुल गांधी यांनी ही टीका केली. 
चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा

चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा

कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चंद्रपूरचे वीजनिर्मिती केंद्र संकटात सापडले आहे. केवळ एक दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असून कोणत्याही क्षणी वीजनिर्मितीत कपात केली जाऊ शकते. जिल्ह्यात बहुतांश कोळसा खाणी भूतल आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी भरल्याने उत्पादन बंद करावे लागते. वीज केंद्राला कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक खाणींमध्ये हीच स्थिती असल्याने वीज केंद्राला होणारा कोळशाचा पुरवठा कमी होत आहे. 
'ठुमके' लावणे युपी पोलिसांना पडू शकते महागात

'ठुमके' लावणे युपी पोलिसांना पडू शकते महागात

उत्तर प्रदेशमधील पोलीस दलातील शिपायांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. औरिया जिल्ह्यामध्ये शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस दलातील ऑन ड्युटी शिपाई भोजपूरी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. आप्तकालीन मदत क्रमांक असणाऱ्या ‘युपी १००' या विशेष पोलीस दलाचे हे जवान असल्याची माहिती आता समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पोलिसांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.  
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more